Viral Video: पाणीपुरी खाण्यावरून दोन तरुणांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ज्यात दोन तरूण रस्त्यावर येवून फिल्मी स्टाईलमध्ये मारामारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाणी पुरी खाण्यावरून वाद झाला आहे.
Viral Video: एका ताटात साधारणतः 6 पाणीपुऱ्या मिळतात हे सर्व सामान्य लोकांना माहितच आहे. पण जर कोणी सात पाणीपुरी खाण्याचा आग्रह धरला तर? होय सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्यात दुकानदाराकडून ग्राहक 7 पुऱ्यांची मागणी करतो पंरतु दुकानदाराने पुरी न दिल्याने त्यांच्या चांगला वाद होतो. पाणीपुरी हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. काही मोजकीच लोकं आहेत जी पाणी पुरी खात नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये, दुकानदार आणि ग्राहक यांच्यात 10 रुपयांमध्ये 7 गोलगप्पा खाऊ घालण्यासाठी जोरदार वाद विवाद होत असतो आणि त्यानंतर दोघेही फिल्मी स्टाईलमध्ये भांडण देखील होतं. ही घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूरची आहे. हमीरपूरमधील अकील तिराहे येथे पाणीपुरी विकणारा एक तरुण 10 रुपयांना पाच गोलगप्पा विकतो, मात्र एका तरुणाने 10 रुपयांना 7 पाणीपुरी खाऊ घातल्याने त्याच्याशी वाद सुरू झाला, त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दोघे एकमेकांना मारत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)