Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाचा हलगरजीपणा, शौचालयामध्ये केल 'हे' कृत्य; प्रवाशी अटकेत

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशाच्या हलगरजीपणामुळे ट्रेन थांबवण्यात आली. शौचालयात असं काही काम केलं ज्यामुळे ट्रेन मधील इतर प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागला आहे.

smoking in vande bharat train PC twitter

Smoke in Vande Bharat Express: तिरुपती-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने शौचालयात धुम्रपान केल्याने खोटा अलार्म आणि स्वयंचलित अग्निशामक यंत्र वाजले. धुम्रपान केल्याचा धुर संपुर्ण ट्रेन मध्ये पसरला. त्यामुळे प्लास्टिकचं सामान जळून गेले. ट्रेन मध्ये संपुर्ण धूरेची लाट पसरली. बुधवारी संध्याकाळी ट्रेन काही काळ मनुबोलु येथे थांबवली, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. टीसीपासून वाचण्यासाठी तो विना तिकीट प्रवास करत शौचालयात लपून बसला होता. आंध्र प्रदेशातील गुडूर येथून पुढे गेल्यानंतर ट्रेन क्रमांक 20702 मधील कोच सी-13 मध्ये ही घटना घडली, असे अधिकाऱ्याने सांगितले. मनुबोलु येथे ट्रेन थांबवण्यात आली आणि प्रवाशाला अटक करण्यात आली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now