Leopard Attack in Andhra Pradesh: तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा बिबट्याने घेतला बळी, पहा व्हिडिओ

बिबट्याने अचानक मुलीवर झेपावत तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या शरीराचा अर्धा भाग खाऊन टाकला. ही घटना समोर आल्यानंतर मंदिरात जाणारे सर्व भाविक घाबरले आहेत.

Leopard Attack: आंध्र प्रदेशातील तिरुपती येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तिरुमला टेकडीवर वसलेल्या जगप्रसिद्ध भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी जात असताना एका 6 वर्षीय मुलीचा बिबट्याने बळी घेतला. मंदिरात दर्शनासाठी पायी जात असताना बिबट्याने मुलीवर हल्ला केला. बिबट्याने अचानक मुलीवर झेपावत तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या शरीराचा अर्धा भाग खाऊन टाकला. ही घटना समोर आल्यानंतर मंदिरात जाणारे सर्व भाविक घाबरले आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना दिली आहे. शनिवारी सकाळी मुलीचा मृतदेह सापडला. बिबट्याने मुलीच्या शरीराचा जवळपास अर्धा भाग खाल्ला होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपघातानंतर मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये घबराट पसरली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)