Cold Wave: जीवघेण्या कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचे सोपे उपाय (पाहा व्हिडिओ)
कडाक्याच्या थंडीत बाहेर राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांना थंडीच्या लाटेचा धोका जास्त असतो, दरम्यान, जीवघेण्या कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचे सोपे उपाय, पाहा व्हिडीओ
Cold Wave: सध्या देशाच्या विविध भागात कडाक्याची थंडी आणि थंडीच्या लाटेचा कहर वाढल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. कडाक्याच्या थंडीत बाहेर राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांना थंडीच्या लाटेचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत, सावधगिरी बाळगून, आपण कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करू शकतो. शरीर उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घाला. दिवसाच्या सूर्यप्रकाशात काम करा, काम करतांना लहान ब्रेक घ्या. हिवाळ्यात उष्णतेची अनुभूती येण्यासाठी गरम पेयांची मदत घ्या, पण दारू पिणे टाळा. बेघर असाल तर सरकारी रात्र निवारागृहात आश्रय घ्या. आपत्कालीन परिस्थितीत, 108 किंवा स्थानिक रुग्णवाहिका क्रमांकावर कॉल करा किंवा रुग्णालयात जा. या मार्गांनी तुम्ही थंडीच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)