Satyendar Jain Heath Update: सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली; दिल्लीतील LNJP रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलवले

तिहार तुरुंग प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6 वाजता सत्येंद्र जैन सीजे-7 रुग्णालयाच्या एमआय रूमच्या बाथरूममध्ये पडले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. पाठ, डावा पाय आणि खांदा दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आले.

Satyendar Jain (PC- ANI)

Satyendar Jain Heath Update: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांची प्रकृती आणखी खालावली आहे. आता त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयातून एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना एलएनजेपी रुग्णालयातील आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तिहार तुरुंग प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6 वाजता सत्येंद्र जैन सीजे-7 रुग्णालयाच्या एमआय रूमच्या बाथरूममध्ये पडले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. पाठ, डावा पाय आणि खांदा दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आले. (हेही वाचा - Hyderabad Murder Case: हैदराबादमध्ये श्रद्धा हत्याकांडासारखे कृत्य! लिव्ह-इन पार्टनरने कटर मशिनने केले गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे 6 तुकडे)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement