Kangana Ranaut Slapping Incident: कंगना रणौतला कानाखाली मारल्या प्रकरणी संजय राऊत यांनी केलं वक्तव्य, म्हणाले 'आईसाठी कायदा हातात घेतला' (VIDEO)
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कंगणा राणौतला सीआयएसएफ (CISF) कॉन्स्टेबलने थप्पड मारल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
Kangana Ranaut Slapping Incident: उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कंगणा राणौतला सीआयएसएफ (CISF) कॉन्स्टेबलने थप्पड मारल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कॉन्स्टेबलने कायदा हातात घ्यायला नको हवा होता, परंतु एका जवानाने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला. त्यांची आई देखील भारत माता आहे आणि जे शेतकरी आंदोलनात बसले होते ते सर्व भारत मातेचे पुत्र होते. जर कोणी भारतमातेचा अपमान केला असेल आणि कोणाला राग आला असेल तर मला वाटते की आपण याचा विचार केला पाहिजे. मला कंगनाबद्दल सहानुभूती आहे. ते खासदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर हात उगारू नयेत, देशात शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे असं राऊत म्हणाले. (हेही वाचा- दिल्ली मध्ये एनडीए च्या बैठकीला सुरूवात; Eknath Shinde, Ajit Pawar सहभागी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)