Running Bus Fire: आग्रा येथील चालत्या बसला लागली भीषण आग, प्रवशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून घातल्या उड्या
नोएडाहून आग्र्याकडे येणाऱ्या बसला भीषण आग लागली आहे. आग्रातील बसमध्ये आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Running Bus Fire: आग्रा येथील चालत्या खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. नोएडाहून आग्र्याकडे येणाऱ्या बसला भीषण आग लागली आहे. माइलस्टोन 164 नोएडा एक्स्प्रेस वेवर आग लागली. प्रवाशांनी बसमधून उड्या मारून स्वत:चे प्राण वाचवले आहे. बसमधील प्रवाशांचे सामान जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. एतमादपूर परिसरातील माइलस्टोन 164 ची घटना आहे. चालत्या बसला आग लागल्यामुळे प्रवाशांचा गोधंळ उडाला. दरम्यान त्यांनी जीव वाचवण्यासाठी बस मधून उड्या मारल्या. प्रवाशांच्या वस्तू बसमध्येच जळून खाक झाल्या आहे. प्रवाशांनी वेळीच सावध राहत स्वत: चे जीव वाचवले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)