Rohtak Train Explosion: पोटॅशियम सल्फाइडमुळे रोहतकहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये स्फोट; 4 प्रवासी जखमी (Watch Video)

पोटॅशियम सल्फाइडमुळे हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. अधिकारी तपास करत आहेत.

Photo Credit- X

Rohtak Train Explosion: रोहतकहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 28 ऑक्टोबर रोजी स्फोट झाल्याची (Rohtak Train Explosion) घटना घडली आहे. स्फोटामुळे ट्रेनच्या एका डब्याला आग लागली. चार प्रवासी जखमी झाले. ही घटना सानपाला शहराजवळ घडली. स्थानिक अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. प्रारंभिक अहवाल असे दर्शवतो की स्फोट पोटॅशियम सल्फाइडमुळे झाला होता. ज्यामुळे प्रवासी गाड्यांच्या सुरक्षिततेच्या उपायांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात रेल्वेचा डब्बा संपूर्ण धूराने माखलेला आहे. (हेही वाचा:Fake Lawyers in Delhi: बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून 107 बनावट वकिलांची हकालपट्टी; दिल्लीतून प्रकरण उघडकीस )

 पोटॅशियम सल्फाइडमुळे रोहतकहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये स्फोट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)