Delhi: दिल्लीतील औरंगजेब लेनचे नामांतरण; आता डॉ एपीजे अब्दुल कलाम लेन नावाने ओळखला जाणार रस्ता
नवी दिल्ली नगरपरिषद (NDMC) ने या संदर्भात सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत रस्त्याचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. याआधी 2015 मध्ये NDMC ने औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड केले होते.
Delhi: दिल्लीत औरंगजेब लेनचे नामकरण करण्यात आले आहे. आता हा रस्ता डॉ.एपीजे अब्दुल कलाम लेन म्हणून ओळखला जाणार आहे. नवी दिल्ली नगरपरिषद (NDMC) ने या संदर्भात सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत रस्त्याचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. याआधी 2015 मध्ये NDMC ने औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड केले होते. आता गल्लीचे नावही बदलण्यात आले आहे. औरंगजेब लेन अब्दुल कलाम रोडला मध्य दिल्लीतील पृथ्वीराज रोडला जोडला जातो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)