Sensex Opening Bell: शेअर बाजारात विक्रमी वाढ सुरू; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, निफ्टी 21250 पार

शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 83.30 वर सपाट होताना दिसला.

Representational Image (Credits: Wikimedia Commons)

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी वाढीचा कल कायम आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ झाली. दुसरीकडे निफ्टीनेही 21,250 चा टप्पा पार केला. सकाळी 9.44 वाजता, सेन्सेक्स 165.40 (0.23%) अंकांच्या वाढीसह 70,701.76 वर व्यवहार करताना दिसला तर निफ्टी 58.15 (0.27%) अंकांच्या वाढीसह 21,240.85 वर व्यवहार करताना दिसला. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 83.30 वर सपाट होताना दिसला.

तथापी, बाजारात आयटी आणि मेटल समभागात चौफेर खरेदी दिसून आली. हिंदाल्को आणि इन्फोसिस निफ्टीमध्ये 2% पर्यंत वाढीसह टॉप गेनर्स म्हणून व्यवहार करताना दिसत आहेत. तर एचडीएफसी टॉप लूसर म्हणून व्यवहार करताना दिसत आहे. याआधी गुरुवारी सेन्सेक्स 929 अंकांच्या उसळीसह 70,514 वर बंद झाला होता.