RBI releases : बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या 34 अनधिकृत संस्थांची आरबीआयकडून यादी जाहीर
अनधिकृत इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर (ETPs) परकीय चलन व्यवहार करू नका किंवा अनधिकृत विदेशी चलन व्यवहारांसाठी पैसे पाठवू अथवा जमा करू नका, असा इशारा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने लोकांना बुधवारी (7 सप्टेंबर) पुन्हा एकदा दिला आहे.
अनधिकृत इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर (ETPs) परकीय चलन व्यवहार करू नका किंवा अनधिकृत विदेशी चलन व्यवहारांसाठी पैसे पाठवू अथवा जमा करू नका, असा इशारा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने लोकांना बुधवारी (7 सप्टेंबर) पुन्हा एकदा दिला आहे.
आरबीआयने अशा 34 संस्थांची यादी जारी केली आहे. ज्यांना परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA), 1999 अंतर्गत परकीय चलन व्यवहार करण्यासाठी अधिकृत परवानगी नाही किंवा परकीय चलन व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ऑपरेट करण्यास अधिकृतता नाही.
आरबीआयने एक पत्रक जारी करत 7 सप्टेंबरला म्हटले आहे की, 'अॅलर्ट लिस्ट' सर्वसमावेशक नाही. तसेच या प्रेस रीलिझच्या वेळी RBI ला जी माहिती उपलब्ध होती त्यावर आधारित आहे. अलर्ट लिस्टमध्ये न दिसणाऱ्या संस्था आरबीआय अधिकृत असल्याचे गृहीत धरले जाऊ नये. त्यांच्याबाबत माहिती उपलब्ध झाल्यावर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)