Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येचे समर्थन करणाऱ्या रशिदचा बुलंदशहर पोलीसांकडून शोध सुरू

सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रशीदला असे म्हणताना ऐकू येते की, जेव्हा कोणी रागाच्या भरात असतो तेव्हा तो कोणाचेही 35 तुकडे करू शकतो, 36 तुकडे करू शकतो.

बुलंदशहर पोलीस (Bulandshahr Police) श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येचे समर्थन करत व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या राशिद खानचा शोध घेत आहेत. सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रशीदला असे म्हणताना ऐकू येते की, जेव्हा कोणी रागाच्या भरात असतो तेव्हा तो कोणाचेही 35 तुकडे करू शकतो, 36 तुकडे करू शकतो. आपण हत्येचे समर्थन करत आहात का असे विचारले असता रशीद म्हणतो की 'असे होते'. तो म्हणतो, जर मी रागात असेन, तर मी देखील असेच वागू शकतो.

एसएसपी बुलंदशहर यांनी सांगितले की, हा व्हिडिओ दिल्लीत बनवला गेला आहे, परंतु तो माणूस बुलंदशहरचा असल्याचा दावा करत असल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि आम्हाला या व्यक्तीचा शोध लागताच योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now