Jharkhand Gang Rape News: स्पॅनिश महिला पर्यटकावर सामुहिक बलात्कार, तिघांवर गुन्हा दाखल, झारखंड येथील खळबळजनक घटना
झारखंड येथील दुमका जिल्ह्यात शनिवारी एका स्पॅनिश महिला पर्यटकावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jharkhand News: झारखंड येथील दुमका जिल्ह्यात शनिवारी एका स्पॅनिश महिला पर्यटकावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात पुरुषांनी महिलेवर बलात्कार केल्याचे माहिती मिळाली आहे.या खळबळजनक घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य घेत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तिघांवर बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)