Rajasthan Shocker : राजस्थानच्या जयपूरमध्ये गॅस-सिलिंडरचा भीषण स्फोट, कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

राजस्थानच्या जयपूरमध्ये गॅस-सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्यात घरातील ठेवलेल्या गॅस सिलिंडरला गळती लागल्याने भीषण आग लागली. या अपघातात दोन मुलांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Fire | Pixabay.com

Rajasthan Shocker : राजस्थानच्या जयपूरमध्ये (Jaipur ) घरगूती गॅस-सिलिंडरचा स्फोट(Gas-Cylinder Explosion) होऊन एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू ( Die) झाला आहे. ही घटना विश्वकर्मा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैसल्या गावात घडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व लोक बिहारचे रहिवासी असून येथे भाड्याने राहत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.(हेही वाचा : Pune Shocker: पुण्यात दारूड्या बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement