Rahul Gandhi : जोरदार शक्ती प्रदर्शन करत राहुल गांधी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ( Watch VIDEO )

केरळमध्ये वायनाड मतदार संघाचे खासदार आणि काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांनी उमेदवारी दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.

Photo Credit -X

Rahul Gandhi : वायनाडचे खासदार आणि काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी काही वेळापूर्वी त्यांचा उमेदवारी दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा उपस्थित होत्या. उमेदवारी (Nomination )अर्ज दाखल करण्याआधी राहूल गांधी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. कालपेट्टा येथून रोड शोला सुरुवात केली. या रोड शोमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि दीपा दास, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) चे AICC विद्यार्थी शाखा प्रभारी कन्हैया कुमार, विधानसभेतील विरोधक व्हीडी सतीसन आणि केपीसीसी (केरळ प्रदेश) काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष एम एम हसन रोड शोमध्ये सहभागी झाले होते. (हेही वाचा:Manmohan Singh retires from Rajya Sabha: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची संसदीय राजकारणातून निवृत्ती, मल्लिकार्जुन खरगे यांचे भावनिक पत्र )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement