Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द

गुरुवारी (23 मार्च) सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांचा कारावास आणि 15,000 रुपयांचा दंड ठोठावला.

Rahul Gandhi | (Photo Credits: Twitter/ANI)

राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करत लोकसभा सचिवालयाने आज त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे. गुरुवारी (23 मार्च) सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांचा कारावास आणि 15,000 रुपयांचा दंड ठोठावला. एक दिवसापूर्वी, गुजरातमधील सुरत न्यायालयाने राहुल गांधींना त्यांच्या विधानासाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)