Rahul Gandhi Rides KTM: काँग्रेस खासदार राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यावर, इस्टाग्रामवर फोटो शेअर
KTM 390 ड्यूक मोटारबाईकवर राईड घेत आहे.
Rahul Gandhi Rides KTM: काँग्रेस खासदार राहुल गांधी, सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी त्यांच्या केटीएम 390 ड्यूक मोटारबाईकवरून लेह शहरातून नयनरम्य पॅंगोंग तलावापर्यंत पोहोचले. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी फोटो शेअर करत म्हणाले "वाटेवर एक पॅंगॉन्ग नावाचे तलाव आहे, ज्याला माझे वडील म्हणायचे, हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे." सद्या हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. गुरुवारी दुपारी राहुलचे लेहमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. 25 ऑगस्टपर्यंत तो लडाखमध्ये राहणार आहे. शुक्रवारी त्यांनी लेहमधील तरुणांशी संवाद साधला आणि एका फुटबॉल सामन्यालाही हजेरी लावली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)