Jammu kashmir News: 'जय श्री राम' लिहिल्याबद्दल विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण, परिसरात तीव्र आंदोलने (Watch video)
जम्मू आणि काश्मीर येथे धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी तीव्र आंदोलने केली जात आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारलं आहे.
Jammu kashmir News: जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत फळावर जय श्री राम लिहल्याबद्दल शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली. या धक्कादायक घटनेनंतर शिक्षकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आली. त्याने दावा केला की शिक्षकाने त्याला बेदम मारलं. त्याने वर्गात ब्लॅकबोर्डवर "जय श्री राम" लिहिले होते त्यामुळे शिक्षकाने मारलं. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर मुख्याध्यापक आणि शिक्षकां विरुध्दात तीव्र आंदोलने केले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये मारहाण करण्यात आली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)