PM Modi's Craze In Kerala: कोचीमध्ये जनतेत दिसलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं क्रेझ; फुलांचा वर्षाव करत केलं मोठ्या उत्सवात केलं मोदींचं स्वागत, Watch Video
कोचीमध्ये रोड शो दरम्यान पीएम मोदी पायी चालले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. लोकांनी पंतप्रधानांवर फुलांचा वर्षाव करत स्वागत केलं. हे सर्व दृश्य पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींची जनतेतील क्रेझ पाहायला मिळाली.
PM Modi's Craze In Kerala: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सोमवारी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर पोहोचले. पंतप्रधान कोची येथील INS गरुड नौदल हवाई स्टेशनवर उतरले. कोचीमध्ये रोड शो दरम्यान पीएम मोदी पायी चालले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. लोकांनी पंतप्रधानांवर फुलांचा वर्षाव करत स्वागत केलं. हे सर्व दृश्य पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींची जनतेतील क्रेझ पाहायला मिळाली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांनाही पंतप्रधानांनी हात हलवून अभिवादन केले. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शहरात 2,060 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा -PM Modi's Schedule: पीएम नरेंद्र मोदींचा झंझावाती दौरा; अवघ्या 36 तासात करणार 5300 किमीचा प्रवास, 7 शहरांमध्ये 8 कार्यक्रमात होणार सहभागी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)