Assembly Elections Results 2023: तीन राज्यांतील विधानसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार; म्हणाले...,

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, वर्षानुवर्षे भाजप मुख्यालय अशा अनेक प्रसंगांचे साक्षीदार आहे. आज जनतेसमोर नम्रपणे नतमस्तक होण्याची आणखी एक संधी आली आहे.

PM Narendra Modi (PC - ANI/Twitter)

Assembly Elections Results 2023: देशातील तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्रिपुरा आणि नागालँड या तीनपैकी दोन राज्यांमध्ये भाजपला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. तर मेघालयमध्ये भाजपने 02 जागा जिंकल्या आहेत. येथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, राज्यात एनपीपीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी सरकार स्थापनेसाठी भाजपचा पाठिंबा मागितला आहे. त्यानंतर राज्यात त्रिशंकू विधानसभा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, वर्षानुवर्षे भाजप मुख्यालय अशा अनेक प्रसंगांचे साक्षीदार आहे. आज जनतेसमोर नम्रपणे नतमस्तक होण्याची आणखी एक संधी आली आहे. मी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या लोकांप्रती माझे मस्तक झुकवून कृतज्ञता व्यक्त करतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement