PM Modi Cleaning Mandir Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली काळाराम मंदिराची स्वच्छता, देशवासियांना केलं 'हे' आवाहन; पहा व्हिडिओ

यासंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे स्वच्छ करून स्वच्छता मोहीम राबवावी.

PM Modi Cleaning Mandir Video (PC - X@airnewsalerts)

PM Modi Cleaning Mandir Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी पहिल्यांदा नाशिकला पोहोचले. येथे त्यांनी रोड शो केला. त्यानंतर श्री काळाराम मंदिराला भेट दिली. या मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. यानंतर पंतप्रधानांनी युवा परिषदेला संबोधित केले. पीएम मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरात स्वच्छता अभियानात सहभागी झाले. यासोबतच पंतप्रधानांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता उपक्रम राबविण्याचे आवाहनही केले. यासंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे स्वच्छ करून स्वच्छता मोहीम राबवावी. आज मला काळाराम मंदिरात जाऊन मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे सौभाग्य लाभले आहे. (हेही वाचा - PM Modi Kalaram Mandir Puja Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा (Watch Video))

पहा व्हिडिओ -  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)