UP Election 2022: मतदारांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन मतदान करा, लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सहभागी व्हा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तसेच लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असेही ते म्हणालेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारपासून सुरू झाले आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. पहिल्या टप्प्यात 58 विधानसभा जागांसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवतील. पण त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानापूर्वी ट्वीट करुन सर्व मतदारांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असेही ते म्हणालेत.
Tweet