Girish Bapat Passes Away: गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले- मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यक्त केला शोक
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये ज्येष्ठ भाजपा नेते गिरीश बापट यांनी दुर्धर आजाराशी लढताना अखेरचा श्वास घेतला आहे.
पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी आज (29 मार्च) निधन झालं आहे. देशभरातून आणि महाराष्ट्रात सर्वपक्षीयांकडून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शोक संदेश व्यक्त करत गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खासदार #गिरीष_बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले- मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी व्यक्त केला शोक. #girishbapat #Pune #Maharashtra @DDNewslive pic.twitter.com/xDFx4hbfSr
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)