Rajya Sabha Election 2024: महायुतीत शिवसेना कडून एकनाथ शिंदेंनी दिली Milind Deora यांच्या राज्यसभेच्या उमेदवारी ला पसंती

milind deora | Twitter

कॉंग्रेस मधून भाजपा मध्ये गेलेल्याअशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ शिवसेना पक्षा कडून कॉंग्रेस मधूनच आलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याचं वृत्त समोर आलं आहे.  महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा आहेत. दरम्यान लोकसभेसाठी दक्षिण मुंबई मधून अरविंद सावंत यांच्याविरूद्ध त्यांच्या उमेदवारीची चर्चा होती पण आता त्यांना राज्यसभेतून केंद्रात पाठवले जाणार आहे. मिलिंद देवरा उद्या राज्यसभेसाठी अर्ज सादर करतील अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.  Rajya Sabha Election 2024: भाजपा कडून Ashok Chavan, Medha Kulkarni, Dr Ajeet Gopchade यांना महाराष्ट्रात राज्यसभेची उमेदवारी जाहीर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)