Rahul Gandhi: सरतेशेवटी सत्याचा विजय आणि अहंकाराचा पराजय होणार, संजय राऊतांना पाठींबा दर्शवत राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
कॉंग्रेसनेते राहुल गांधींनी संजय राऊतांना पाठींबा दर्शवत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl Scam) ईडीची (ED) कारवाई सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी राऊतांच्या मुंबईतील (Mumbai) राहत्या घरी छापेमारी करत त्यांना ताब्यात घेण्यात आलं. तर 4 ऑगस्ट पर्यत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. संबंधित प्रकरणी फक्त महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर संपूर्ण देशभरातील राजकीय पक्षामध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र बघायला मिळाल. राष्ट्रवादी (NCP), कॉग्रेससह (Congress) विविध राजकिय पक्षांनी संजय राऊतांना पाठींबा दर्शवला. कॉंग्रेसनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) देखील संजय राऊतांना पाठींबा दर्शवत केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)