Nawab Malik On Rafel: भारताच्या राफेल खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण, आगामी काळात यातील सत्य नक्कीच समोर येईल - नवाब मलिक

मात्र केंद्र सरकार हे स्वीकारायला तयार नाही. आगामी काळात यातील सत्य नक्कीच बाहेर येईल, असे नवाब मलिक म्हणाले.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

राफेल खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांनी आपली भूमिका मांडली आहे. राफेल खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाला हे सर्वांचे स्पष्ट मत आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या व्यवहाराला क्लीन चीट मिळाल्याची भूमिका केंद्राने घेतली. मात्र भविष्यात सत्ता बदल झाल्यानंतर सत्य जनतेसमोर येईल, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले. तसेच भारताच्या राफेल खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र केंद्र सरकार हे स्वीकारायला तयार नाही. आगामी काळात यातील सत्य नक्कीच बाहेर येईल, असे नवाब मलिक म्हणाले.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)