Pankja Munde : बीडच्या केजमध्ये मराठा आंदोलकांकडून पंकजा मुंडेंची अडवणूक; पोलिसांकडून सौम्य लाठीमार
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आजपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशाच एका प्रसंगाला बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना सामोरं जावं लागलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना शेवटी बळाचा वापर करावा लागला.
Pankja Munde : बीडच्या केज तालुक्यातील पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताह (Harinam Saptaha) सुरू होता. तिथे सप्ताहाला भेट देण्यासाठी पंकडा मुंडे गेल्या होत्या. पंकजा मुंडे यांना पाहताच मराठा आंदोलकांनी (Maratha Protesters)आरक्षण प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी दर्शन करून पंकजा मुंडे यांनी काढता पाय घेतला. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी अगोदरच मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जवळपास २० मिनीटे हा गोंधळ सुरूच होता. (हेही वाचा : Pankaja Gopinath Munde: पंकजा मुंडे यांच्या मनात चाललंय तरी काय? शिवशक्ती परिक्रमा यात्रा संपताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधान )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)