Karnataka Election 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कर्नाटक विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कॉंग्रेस वर सडकून टीका; 'वॉरंटी संपलेल्या पक्षाची गॅरंटीही संपलेली'

कॉंग्रेस शासित अनेक राज्यामध्ये अजूनही लोकं त्यांना दिलेल्या वचनांची पूर्तता होण्याची वाट पाहत आहेत.

PM Narendra Modi (PC - ANI/Twitter)

कर्नाटक मध्ये सध्या विधानसभा निवडणूकीचे पडघम सुरू आहेत. प्रचारासाठी सारेच सरसावले आहेत. अशामध्ये पंतप्रधानांनी भाजपा कार्यकर्त्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. कॉंग्रेस शासित अनेक राज्यामध्ये अजूनही लोकं त्यांना दिलेल्या वचनांची पूर्तता होण्याची वाट पाहत आहेत. ज्या पक्षाची वॉरंटी संपली आहे त्यांंच्या गॅरंटीचं काय घेऊन बसलात असे मोदी म्हणाले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now