ED summons Amol Kirtikar : खिचडी घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीचे समन्स
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे अमोल किर्तीकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ED summons Amol Kirtikar : कोरोना काळात खिचडी घोटाळा झाल्याचे आरोप अमोल कीर्तीकर( Amol Kirtikar) यांच्यावर करण्यात आले आहेत. ईडीकडून त्यांना समन्स (ED summons) बजवण्यात आले आहे. अमोल कीर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. सुमारे पाच तास त्यांची चौकशी झाली. शिवसेनेतील फुटीनंतर गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात दाखल झाले आहेत, तर त्यांचे पूत्र अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे गटात(Uddhav Thackeray Group) आहेत. (हेही वाचा : ED Summons Dinesh Bobhate : अनिल देसाई यांचे निकटवर्ती दिनेश बोभाटे यांना ईडीचे समन्स, आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)