Assembly poll in Rajasthan Date: राजस्थान मध्ये विधानसभेच्या निवडणूका 23 ऐवजी 25 नोव्हेंबर दिवशी

निवडणूक आयोगाने राजस्थान मधील विधानसभेच्या निवडणूक तारखेमध्ये बदल केला आहे.

Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राजस्थान मध्ये विधानसभेच्या निवडणूका 23 ऐवजी 25 नोव्हेंबर दिवशी घेतल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने त्याबाबतचं पत्रक जारी केले आहे. 23 नोव्हेंबर हा देव उठणी एकादशीचा दिवस आहे. या दिवशी अनेक लग्नं असल्याने निवडणूकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.   3 डिसेंबर दिवशीच सार्‍या राज्यांसोबत त्याची मतमोजणी होणार आहे. राजस्थान मध्ये एकाच टप्प्यात 200 जागांसाठी निवडणूक होणार आहे.   Assembly Polls 2023 Date and Result: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाच्या निवडणूक तारखा जाहीर; 3 डिसेंबर दिवशी मतमोजणी.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)