Abhishek Ghosalkar Murder Case : 'अभिषेक यांच्याबरोबर मलाही मारण्याचा मॉरिसचा कट होता'; पत्नी तेजस्वी घोसाळकर यांचा दावा

 उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. फेसबूक ऑनलाईन सुरू असताना मॉरिस नारोन्हा याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आता अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नींनी धक्कादायक खुलासा केला आहे.

Photo Credit - Facebook

Abhishek Ghosalkar Murder Case: अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेतून धक्कादायक आरोप केले आहेत. अभिषेक यांच्याबरोबरच आपल्यालाही मारण्याचा मॉरिस नारोन्हा ( Mauris Noronha ) ऊर्फ मॉरिस भाईचा कट होता असं तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी म्हटलं आहे. मॉरिस याने साडीवाटपाच्या कार्यक्रमासाठी अभिषेक यांच्यासह मलाही येण्यासाठी सांगितले होते. पण, काही कारणास्तव मला उशीर झाला. त्यामुळे मी तिथे गेले नाही. त्यांनी मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवलं. असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या. (हेही वाचा : Uddhav Thackeray On Abhishek Ghosalkar Murder: अभिषेक घोसाळकर हत्या आणि Mauris Noronha आत्महत्या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला संशय; गृहमंत्री फडणवीस यांच्यावर पुन्हा कडाडून टीका!)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now