PM Modi on Canada Hindu Temple Attack: 'भारतीयांना धमकावण्याचा भ्याड प्रयत्न'; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 4 नोव्हेंबर रोजी कॅनडाच्या ओंटारियो प्रांतातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर नुकत्याच झालेल्या "जाणूनबुजून हल्ल्याचा" निषेध केला.

PM Narendra Modi (PC - ANI/Twitter)

PM Modi on Canada Hindu Temple Attack: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोमवारी, 4 नोव्हेंबर रोजी कॅनडाच्या ओंटारियो प्रांतातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर (Hindu Temple) झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान मोदींनी कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याला देशातील भारतीयांना धमकावण्याचा भ्याड प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. 'कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आमच्या मुत्सद्दींना धमकावण्याचा भ्याड प्रयत्न तितकाच भयंकर आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे भारताचा संकल्प कधीही कमकुवत होणार नाही. कॅनडाच्या सरकारने न्याय सुनिश्चित करावा आणि कायद्याचे पालन कायम राखावे, अशी आमची अपेक्षा आहे',असे पीएम मोदींनी एक्सवर लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा निषेध

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now