Bihar Train Stone Pelting: महाकुंभ ला जाणाऱ्या स्वतंत्र सेनानी सुपर एक्सप्रेस ट्रेनवर प्रवाशांची दगडफेक; ट्रेनमध्ये जागा नसल्यामुळे खिडक्यांच्या काचा फोडल्या (Watch Video)
ही घटना मधुबनी रेल्वे स्थानकावर घडली. महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी स्वतंत्र सेनानी सुपर एक्सप्रेस ट्रेनची वाट पाहत होते. मात्र, चढण्यासाठी जागा नसल्याने संतापलेल्या प्रवाशांनी ट्रेनची तोडफोड केली.
Bihar Train Stone Pelting: महाकुंभ ला (Maha Kumbh 2025) जाण्यासाठी देशभरातून भाविक रेल्वे स्थानकांवर गर्दी करत आहेत. मात्र, प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी जागा मिळत नसल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. त्यामुळे संतापाच्या भरात नागरिक ट्रेनची तोडफोड करत आहेत. अशीच घटना मधुबनी स्थानकावर घडली. ट्रेन आधीच प्रवाशांनी खचाखच भरून आली होती. त्यात स्थानकावर उभे असलेल्या शेकडो नागरिकांना ट्रेनमध्ये चढायचे होते. संधी आणि जागा मिळत नसल्याने संतापलेल्या प्रवाशांनी ट्रेनच्या काचा लाथा मारून, दगडाचा वापर करून फोडल्या. या घटनेचा व्हिडीओ समोर आाला आहे. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी मधुबनी रेल्वे स्थानकावर घडल्याचे सांगितले जात आहे. महाकुंभ यात्रेकरूंसाठी रेल्वेने जबलपूर ते प्रयागराज ४० विशेष गाड्या तैनात केल्या आहेत. मात्र, तरीही ही सुविधा अपूरी पडत आहे.
स्वतंत्र सेनानी सुपर एक्सप्रेस ट्रेनवर प्रवाशांची दगडफेक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)