SC on Theft In Train: रेल्वे प्रवास करताना प्रवाशांनी स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण करावे; 18 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

रेल्वेच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, या प्रकरणात प्रवासी कमरेला बांधलेल्या बेल्टमध्ये 1 लाख रुपये रोख घेऊन जात होता. रेल्वे प्रवासादरम्यान रोकड चोरीला गेली. ही घटना 2005 ची आहे.

Supreme Court | (Photo Credits: IANS)

SC on Theft In Train: 2005 मध्ये एका प्रवाशाची रेल्वे प्रवासादरम्यान 1 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. यानंतर ग्राहक आयोगाने या प्रवाशाला त्याचे पैसे परतफेड करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने आज ग्राहक आयोगाचा हा आदेश बाजूला ठेवला आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने हा आदेश बाजूला ठेवताना सांगितले की, ही रेल्वेची कमतरता नाही. जर प्रवासी स्वत:च्या सामानाचे रक्षण करू शकत नसेल तर यासाठी रेल्वेला जबाबदार धरता येणार नाही.

सुनावणीदरम्यान, रेल्वेच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, या प्रकरणात प्रवासी कमरेला बांधलेल्या बेल्टमध्ये 1 लाख रुपये रोख घेऊन जात होता. रेल्वे प्रवासादरम्यान रोकड चोरीला गेली. ही घटना 2005 ची आहे, जेव्हा कापड व्यापारी - सुरेंद्र भोला, ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्यांचे पैसे हरवले. (हेही वाचा - SC on Bike-Taxi Ban In Delhi: राजधानीत बाइक, टॅक्सी, UBER आणि Rapido वर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिली स्थगिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement