Fight On Thai Smile Airline Flight: बँकॉक ते कोलकाता फ्लाइटमध्ये सहा जणांची प्रवाशाला बेदम मारहाण, पहा व्हिडिओ

बँकॉक ते कोलकाता असा प्रवास करत असताना काही प्रवाशांनी फ्लाइटमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Thai Smile Airline Flight

27 डिसेंबर रोजी बँकॉक ते कोलकाता असा प्रवास करत असताना काही प्रवाशांनी फ्लाइटमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये दोन पुरुष वाद घालताना दिसत आहेत. एक एअर होस्टेस भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी सहा पुरुष एका माणसाला पाठिंबा देण्यासाठी येतात. नंतर ते दुसर्‍याला मारहाण करण्यास सुरवात करतात. वाद घालताना दिसलेल्या पुरुषांपैकी एकाने दुसऱ्या व्यक्तीला थप्पड मारून त्याचे केस ओढायला सुरुवात केली. बाकी सर्व प्रवासी हा संपूर्ण एपिसोड पाहताना दिसतात पण कोणी काही बोलत नाही.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now