Kerala Video: केरळ मधील वयोवृध्द सासूला मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल, आरोपी महिलेला अटक

केरळ मधील एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हिंसकपणे एक महिला आपल्या वयोवृध्द सासूला मारहाण करत आहे.

Beaten Up Video

Kerala Video: केरळ मधील एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हिंसकपणे एक महिला आपल्या वयोवृध्द सासूला मारहाण करत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे महिला बेडवर बसलेल्या सासूला धक्का देते आणि त्या जमिनीवर पडतात. त्यानंतर शिवीगाळ देखील करतात. हा व्हिडिओ ऑनलाईन समोर आल्यानंतर संपातलेल्या नेटकऱ्यांनी महिलेविरुध्द कारवाईची मागणी केली. मंजू थॉमस असं या आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. महिलेला न्यायालयात देखील हजर करण्यात येणार आहे.नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून या महिलेचा निषेध केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now