Odisha Fire: संबलपूरमध्ये दोन ठिकाणी अग्नितांडव, आगीवर नियत्रंण मिळवण्यात यश
ओडिशाच्या संबलपूर शहरातील खेतराजपूर भागात १२ नोव्हेंबरला दोन ठिकाणी भीषण आग लागली.
Odisha Fire: ओडिशाच्या संबलपूर शहरातील खेतराजपूर भागात १२ नोव्हेंबरला दोन ठिकाणी भीषण आग लागली. एक आग बोरीच्या गोदामाला लागली तर दुसरी आग निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, तर बोरीच्या गोदामाला लागलेली आगही विझवण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार आगीच्या दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)