Delhi IAS Coaching Centre Deaths: आता CBI करणार राजेंद्र नगर कोचिंग सेंटरमधील यूपीएससी उमेदवारांच्या मृत्यूंची चौकशी
न्यायालयाने या निर्णयामागे घटनांचे गांभीर्य आणि लोकसेवकांचा भ्रष्टाचाराचा संभाव्य सहभाग ही कारणे नमूद केली. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोग (CVC) ला नागरी सेवा इच्छुकांच्या मृत्यूच्या CBI तपासावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
Delhi IAS Coaching Centre Deaths: दिल्ली उच्च न्यायालयाने राजेंद्र नगरमधील तीन यूपीएससी उमेदवारांच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला आहे. न्यायालयाने या निर्णयामागे घटनांचे गांभीर्य आणि लोकसेवकांचा भ्रष्टाचाराचा संभाव्य सहभाग ही कारणे नमूद केली. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोग (CVC) ला नागरी सेवा इच्छुकांच्या मृत्यूच्या CBI तपासावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्लीच्या नागरी संस्थांकडे मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी आवश्यक निधी नसल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. न्यायालयाने नमूद केले की, दिल्लीतील बहुतांश भौतिक पायाभूत सुविधा, जसे की नाले जुने आहेत, जे सुमारे 75 वर्षांपूर्वी घातले गेले होते. उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, नागरी संस्थांकडून न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही, हे अलीकडील दुर्घटनांवरून दिसून आले आहे.
ANI ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)