e-FIR Service: आता किरकोळ गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नाही; आता तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून नोंदवता येणार अशा प्रकरणांचा ई-एफआयआर
तुम्ही तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटरवरून अशा प्रकरणांची ई-एफआयआर नोंदवू शकता. ऑनलाईन एफआयआर नोंदवण्यासाठी तुम्ही खालील ट्विटमधील माहितीचा आधार घेऊ शकता.
e-FIR Service: देशात डिजिटलायझेशनची लाट सुरू आहे. सर्व सेवा आता इंटरनेटवर उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध नसलेल्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यावर काम केले जात आहे. आता आपण घरी बसून कोणतीही वस्तू ऑनलाइन खरेदी करू शकतो, कोणत्याही विभागाच्या सेवा वापरू शकतो. खासगी सेवांसोबतच सरकारी सेवाही ऑनलाइन उपलब्ध आहेत. तुम्ही जवळपास सर्वच विभागांमध्ये ऑनलाइन प्रवेश करू शकता. मध्य प्रदेश सरकारने पोलिस सेवाही ऑनलाइन केल्या आहेत. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनद्वारे ई-एफआयआर नोंदवू शकता. तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती देखील तपासू शकता.
दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जर 15 लाखांपेक्षा कमी किमतीचे वाहन किंवा एक लाखापर्यंतची सर्वसाधारण चोरी झाली असेल किंवा ज्यामध्ये आरोपी अज्ञात असेल किंवा घटनेत कोणतीही दुखापत झाली नसेल, बळाचा वापर केला नसेल, तर अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटरवरून अशा प्रकरणांची ई-एफआयआर नोंदवू शकता. ऑनलाईन एफआयआर नोंदवण्यासाठी तुम्ही खालील ट्विटमधील माहितीचा आधार घेऊ शकता. (हेही वाचा - Delhi: दिल्ली विमातळावर CISF कर्मचार्यांना प्रवाशाच्या बॅगच्या तळाशी सापडले 25 लाख किंमतीची विदेशी चलन, Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)