Nitin Gadkari : पंतप्रधान मोदी आणि कायदे मंत्र्यांना मी अनेकदा सांगतो निर्णय देण्याचा अधिकार न्यायपालिकेचा : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
पंतप्रधान मोदी आणि कायदामंत्र्यांना मी अनेकदा सांगतो की निर्णय काहीही असला तरी निर्णय देण्याचा अधिकार हा फक्त न्यायपालिकेचा आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशातील न्यायव्यस्थेबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. नागपूर (Nagpur) मधील राष्ट्रीय न्याय विद्यापीठात (National Law University) बोलत असताना नितीन गडकरी म्हणाले, पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि कायदामंत्र्यांना मी अनेकदा सांगतो की निर्णय काहीही असला तरी निर्णय देण्याचा अधिकार हा फक्त न्यायपालिकेचा आहे. त्यामुळे न्यायपालिकेकडून (Judicial System) देण्यात येणाऱ्या कुठल्याही निर्णयावर कोणाचाही प्रभाव पडू नये.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)