NewsClick चे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्यासह 2 जणांना अटक, 46 संशयितांची चौकशी; UAPA अंतर्गत करण्यात आली कारवाई

Newsclick शी संबंधित एकूण 37 पुरुष संशयितांची आवारात चौकशी करण्यात आली आहे. तर 9 महिला संशयितांची त्यांच्या घरी चौकशी करण्यात आली.

NewsClick चे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्यासह 2 जणांना अटक, 46 संशयितांची चौकशी; UAPA अंतर्गत करण्यात आली कारवाई
Arrested | (File Image)

Prabir Purkayastha Arrested: दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यूजक्लिक वेबसाइटचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांनाही अटक केली आहे. या दोघांवर यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक या वेबसाइटच्या 30 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. अनेक पत्रकारांनाही ताब्यात घेण्यात आले. Newsclick शी संबंधित एकूण 37 पुरुष संशयितांची आवारात चौकशी करण्यात आली आहे. तर 9 महिला संशयितांची त्यांच्या घरी चौकशी करण्यात आली. यासोबतच पोलिसांनी तपासासाठी पत्रकारांचे लॅपटॉप, मोबाईलसह अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिसांची कारवाई अजूनही सुरूच आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement