Manish Kashyap Released From Jail: यूट्यूबर मनीष कश्यपची 9 महिन्यांच्या तुरुंगवासानंतर सुटका, बाहेर येताच लोकांनी केले जोरदार स्वागत, पाहा व्हिडिओ

22 डिसेंबर रोजी पाटणा उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मंजूर झाला होता. परंतु न्यायालयाचे औपचारिक कागदपत्र पूर्ण न झाल्याने त्याची सुटका होऊ शकली नाही.

युट्युबर मनीष कश्यपची (Manish Kashyap ) शुक्रवारी बनावट व्हिडिओ प्रकरणी (Fake Video Case) पाटणा उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तब्बल 9 महिन्यांनंतर बिहारमधील बेऊर तुरुंगातून आज सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. तुरुंगातून बाहेर येताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर जयघोष सुरू केला. लोकांचे स्वागत केल्यानंतर ते उघड्या गाडीत बसलेले दिसले. काल म्हणजेच 22 डिसेंबर रोजी पाटणा उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मंजूर झाला होता. परंतु न्यायालयाचे औपचारिक कागदपत्र पूर्ण न झाल्याने त्याची सुटका होऊ शकली नाही.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement