YouTuber ने व्हिडिओसाठी रेल्वे रुळांवर पेटवल्या नागगोळ्या, राजस्थानच्या जयपूर येथील दंत्रा स्टेशनवरील घटना (Watch Video)

दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ राजस्थान राज्यातील जयपूर येथील दंत्रा रेल्वेस्टेशन जवळील आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक YouTuber रेल्वे ट्रॅकवर काळ्या रंगाच्या नागगोळ्या पेटवतो आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ राजस्थान राज्यातील जयपूर येथील दंत्रा रेल्वेस्टेशन जवळील आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक YouTuber रेल्वे ट्रॅकवर काळ्या रंगाच्या नागगोळ्या पेटवतो आहे. ज्या पेटवल्यावर प्रचंड धूर आणि धूरच दिसत आहे. ज्यामुळे युट्यूबरला मजा येते आहे. परंतू, त्याला हे कळत नाही की, तो रेल्वे नियमांचे उल्लंघन करतो आहे. तसेच, वायूप्रदूषणही करतो आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंत आरपीएफने व्हिडिओची दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. (हेही वाचा, खांदेश्वर स्थानकात लोकलचा थांबा चुकला, प्रवाशांचा गोंधळ; मध्य रेल्वेने दिले चौकशीचे आदेश)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)