Wrestling Federation of India Elections: गुवाहाटी उच्च न्यायालयाकडून भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती; 11 जुलैला होत्या प्रस्तावित

याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, जोपर्यंत त्याच्या संस्थेला भारतीय कुस्ती महासंघाकडून मान्यता मिळत नाही आणि तो मतदार यादीसाठी आपल्या प्रतिनिधीला नामनिर्देशित करण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवावी.

Court (Image - Pixabay)

येत्या 11 जुलै रोजी होणाऱ्या कुस्ती महासंघाच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी येत आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. आसाम रेसलिंग असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर रविवारी गुवाहाटी उच्च न्यायालयाने सुनावणी करताना, 11 जुलै रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, जोपर्यंत त्याच्या संस्थेला भारतीय कुस्ती महासंघाकडून मान्यता मिळत नाही आणि तो मतदार यादीसाठी आपल्या प्रतिनिधीला नामनिर्देशित करण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवावी. त्यावर न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघ तदर्थ संस्था आणि क्रीडा मंत्रालयाला पुढील सुनावणीची तारीख निश्चित होईपर्यंत, भारतीय कुस्ती महासंघ कार्यकारी समितीची निवडणूक न घेण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा: Vijayawada: पत्नीला घटस्फोटासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल पतीने केली सासूची फ्लायओव्हरवर हत्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now