Woman Smoking In Plane Toilet: इंडिगो फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान करताना आढळली 24 वर्षीय तरुणी; अधिकाऱ्यांकडून अटक
विमानाने उड्डाण केल्यानंतर ही महिला टॉयलेटमध्ये गेली आणि बराच वेळ आतच राहिली.
विमानात धुम्रपान करणे हा भारतीय उड्डाणाचा अतिशय कठोर गुन्हा मानला जातो. आता एका 24 वर्षीय महिला कोलकाता-बेंगळुरू फ्लाइटच्या शौचालयात धुम्रपान करताना आढळली असून, या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. कोलकाता येथून रात्री 9.50 वाजता हे विमान निघते आणि तीन तासांनी बेंगळुरूला पोहोचते. या फ्लाइटमध्ये गेल्या रविवारी, म्हणजेच 5 मार्च रोजी रात्री महिलेने धुम्रपान केल्याची घटना घडली. विमानाने उड्डाण केल्यानंतर ही महिला टॉयलेटमध्ये गेली आणि बराच वेळ आतच राहिली. त्यावरून ती प्रसाधनगृहात धुम्रपान करत असल्याचा संशय फ्लाइट क्रूला आला. या संशयाच्या आधारे त्यांनी महिलेला शौचालयाचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर आतमध्ये धुम्रपान करत असल्याचे आढळून आले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)