Woman Hitting Guard with Sandal: गोवा पलिसांकडून महिला पर्यटकावर अदखलपात्र गुन्हा दाखल, सुरक्षा रक्षकाला शिविगाळ, चप्पलणे मारहाण केल्याचा आरोप

गोवा पोलिसांनी एका पर्यटक महिलेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ओल्ड गोवा परिसरातील सिद्ध बॅसिलिका ऑफ बोम जिझस चर्चसमोर रविवारी सकाळी कथीतरित्या सुरक्षारक्षकाला शिवीगाळ आणि चप्पलने मारहाण केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर महिलेस सुरक्षारक्षकांनी चर्चच्या आवारात प्रवेश करण्यास मज्जाव केला.

Woman Tourist, Goa | (Photo Credit - Twitter)

गोवा पोलिसांनी एका पर्यटक महिलेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ओल्ड गोवा परिसरातील सिद्ध बॅसिलिका ऑफ बोम जिझस चर्चसमोर रविवारी सकाळी कथीतरित्या सुरक्षारक्षकाला शिवीगाळ आणि चप्पलने मारहाण केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर महिलेस सुरक्षारक्षकांनी चर्चच्या आवारात प्रवेश करण्यास मज्जाव केला. या कारणावरुन ही महिला संतप्त झाली होती. त्यातून तिने तिच्यावर आरोप असलेले कृत्य केले.

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी पर्यटकांनी कायदा हातात घेऊ नये, असे सांगितले. जुने गोवा येथे घडलेल्या घटनेत एका महिला पर्यटकाने सुरक्षा रक्षकाला पादत्राणे घालून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अशा घटना आम्ही खपवून घेणार नाही. अदखलपात्र गुन्हा नोंदविला गेला आहे (तिच्याविरुद्ध), पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत,” तो म्हणाला.

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now