Woman Dies by Suicide Over Dark Complexion: सावळ्या रंगाच्या टोमण्यांना कंटाळून नवविवाहित महिलेने केली आत्महत्या; 3 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

या त्रासाला कंटाळून महिलेने आपले जीवन संपवले.

Representational Image (File Photo)

Woman Dies by Suicide Over Dark Complexion: पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यात एका नवविवाहित महिलेने तिच्या सावळ्या  रंगाच्या टोमण्यांना कंटाळून कालव्यात उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृत महिलेचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अहवालानुसार, सासरचे लोक महिलेला सतत ती सावळी असल्याने टोमणे मारत होते. या त्रासाला कंटाळून महिलेने आपले जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय निर्मल कौरचा विवाह मोगा येथील दिलदीपसोबत तीन महिन्यांपूर्वी झाला होता. पण निर्मल कौरचा पती आणि सासरचे लोक तिला टोमणे मारायचे. लग्नाच्या काही दिवसांनी सासरच्या लोकांनी महिलेला माहेरी सोडले. त्यानंतर सोमवारी रात्री केरखेडा गावातून जाणाऱ्या कालव्यात उडी घेऊन महिलेने आत्महत्या केली. (हेही वाचा: Ahemadabad Video: स्वत: चा जीव धोक्यात घालून जवानांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण, अहमदाबाद येथील घटना)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif