Woman Bites Husband: बायकोने रागाच्या भरात तोडला नवऱ्याच्या कानाचा लचका, दिल्ली पोलिसांकडून कारवाई

दिल्लीतील एका महिलेने पतीच्या कानाचा जोरदार चावा घेतला आहे. ज्यामध्ये पतीचा कान तुटला. ही घटना दिल्लीतील सुलतानपुरी भागात घडली. पोलिसांनी पतीच्या तक्रारीच्या आधारे कारवाई करत भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचा आधार घेत पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Husband Wife | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दिल्लीतील एका महिलेने पतीच्या कानाचा जोरदार चावा घेतला आहे. ज्यामध्ये पतीचा कान तुटला. ही घटना दिल्लीतील सुलतानपुरी भागात घडली. पोलिसांनी पतीच्या तक्रारीच्या आधारे कारवाई करत भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचा आधार घेत पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चावा गंभीर असल्याने पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वीच पुणे येथेही घडली होती.

प्राप्त माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.20 च्या सुमारास पती बाहेर कचरा टाकण्यासाठी गेला असता पती-पत्नीमध्ये वाद झाला. पोलिस तक्रारीनुसार, पत्नीने घर विकण्याचा आणि मुलांसह स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तिला मालमत्तेचा हिस्सा देण्याचा आग्रह धरल्याने वाद वाढला. ज्यात महिलेने हिंसक रुप धारण केले.

हिंदीमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पतीने म्हटले आहे की, "मी तिच्याशी समझोता करण्याचा प्रयत्न केला, परंतु मतभेदाचे पर्यवसान मोठ्या शाब्दिक चकमकीत झाले. यादरम्यान तिने माझ्यावर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मी घरातून बाहेर पडत असताना तिने मला मागून पकडले. रागाच्या भरात तिने माझ्या उजव्या कानाला इतका जबरदस्तीने चावा घेतला की त्याचा एक भाग वेगळा झाला, परिणामी खूप रक्तस्त्राव झाला."

एक्स पोस्ट

या धक्कादायक घटनेनंतर जखमी व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी मंगोलपुरी येथील संजय गांधी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर, त्याला रोहिणीतील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, जिथे त्याच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाच्या विलगीकरणासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now