Navratri Colors 2021 Day 8: नवरात्रीच्या अष्टमीला कोणत्या देवीची कराल पूजा आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल

ज्यामुळे 13 ऑक्टोबरला महाअष्टमी आणि 14 ऑक्टोबर रोजी नवमी येत आहे.

Navratri 2021 (File Photo)

7 ऑक्टोबर पासून नवरात्रीच्या (Navratri 2021 )उत्सवाची सुरुवात झाली आहे.नवरात्रीच्या आठव्या दिवसाला महाष्टमी असेही म्हणतात. देवी दुर्गाची आठवी शक्ती महागौरीची पूजा अष्टमी तिथीला केली जाईल. अष्टमी आणि नवमीला मुलींच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या वर्षी, अष्टमीच्या तारखेबद्दल थोडा गोंधळ आहे की अष्टमी 13 तारखेला करायची की 14 तारखेला. यंदा शारदीय नवरात्री 8 दिवसांची आली आहे, ज्यामध्ये तृतीया आणि चतुर्थी एकाच दिवशी होती. ज्यामुळे 13 ऑक्टोबरला महाअष्टमी आणि 14 ऑक्टोबर रोजी नवमी येत आहे. उद्या महागौरी देवीची पूजा केली जाणार आहे.या दिवशी गुलाबी वस्त्र परिधान करून मातेची पूजा करावी.