Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत मतदान न करणाऱ्यास 350 रुपयांचा दंडाचा दावा बोगस, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुकीत मतदान न करणाऱ्यास 350 रुपयांचा दंडाचा दावा बोगस असल्याचं स्पष्टीकरण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Voting | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मतदानाचा अधिकार न बजवणाऱ्यास 350 रुपयांचा दंडाचा (Fine) भरावा लागणार असल्याची एक पोस्ट (Post) सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल (Viral) होताना दिसली. तसेच हा दंड न भरणाऱ्याच्या मोबाईल रिचार्जच्या (Mobile Recharge) माध्यमातून हा दंड आकारण्यात येईल असंही या पोस्टमध्ये नमूद होत पण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून (Press Information Bureau) आता याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया (Election Commission Of India) याप्रकारचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून (PIB) देण्यात आली आहे. तसेच याप्राकारची खोटी माहिती न पडताळता शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement